आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळावरून राष्ट्रवादीचा सरकारला घरचा आहेर; विरोधकांचाही हल्लाबोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दुष्काळाच्या परिस्थितीवरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेच बुधवारी विधान परिषदेत सरकारवर टीका केली. या मुद्द्यावर चर्चेचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्याच आमदारांनी दिला, तर विरोधकांनी सरकार पाणी व चारा माफियांना बळ देत असल्याचा आरोप केला.
नियम 260 अन्वये राज्यातील दुष्काळसदृश्य स्थितीबाबत सभागृहात चर्चा घेण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे हेमंत टकले, विक्रम काळे, उल्हास पवार आदी सदस्यांनी दिला. टकले म्हणाले, दुष्काळी स्थिती गंभीर असून चारा व पाण्याअभावी शेतकºयांचे हाल होत आहेत. शेतकºयांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे. पाणीसाठ्याचा गैरवापर होतोय त्याला आळा घातला पाहिजे. कारखान्यांनी सोडलेल्या दूषित पाण्यामुळं नद्या प्रदूषित होत आहेत. त्यामुळे प्यायला पाणी मिळत नाही. प्रदूषित पाणी शुद्ध करण्याची योजना हाती घेण्याबरोबरच ठिबक सिंचनावरही लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. विजयसिंह मोहिते पाटील यांनीही दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी योजना आखण्याची गरज असल्याचे सांगून हा 1972 पेक्षा भीषण दुष्काळ असल्याचे म्हटले.
सत्ताधारी आमदारांनीच सरकारला धारेवर धरल्यानंतर विरोधकही आक्रमक झाले. विनोद तावडे म्हणाले की, राज्यात दुष्काळ असताना अनेक मंत्री परदेशात फिरत होते. पश्चिम महाराष्ट्राचे मंत्री असतानाही तेथे वर्षानुवर्षे दुष्काळ कायम आहे. दुष्काळामुळे पाणीमाफिया बळावले असल्याचा आरोप करतानाच त्यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे उदाहरणही दिले. जिल्हाधिकाºयांनी पाण्याचा टँकर 25 हजार लीटरचा असल्याचे सांगितले होते, परंतु तो फक्त 20 हजार लीटरचा होता. एवढेच नाही तर त्यात फक्त 15 हजार लिटरच पाणी भरतो, असे टँकरचालकाने कबूल केल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
हे तर सरकारचे नाकर्तेपण- सत्ताधाºयांकडूनच दुष्काळी स्थितीवर चर्चेचा प्रस्ताव मांडला जावा हे सरकारचे अपयश आहे, अशा शब्दांत दिवाकर रावते यांनी हल्ला चढवला.