आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणातील नरकासूराचा वध करा, राणेंच्या पराभवासाठी केसरकरांचा शिवसेनेला पाठिंबा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावंतवाडी- कोकणातील राडासंस्कृती संपविण्याची वेळ आली आहे. मतदानाद्वारे दहशतीला विरोध करा, असे सांगत आमदार दीपक केसरकर यांनी निलेश राणेंना पराभूत करण्यासाठी विरोधकांचे बटण दाबा असे आवाहन केले. दरम्यान, केसरकर यांच्या भूमिकेमुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेला मतदान करण्याचेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यामुळे कोकणात काँग्रेसच्या व राणे पिता-पुत्रांची अडचणीत भर पडली आहे. काँग्रेसला ही जागा गमविण्याची वेळ येऊ शकते.
आमदार दीपक केसरकर यांनी कालच आपल्या आमदारकीसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपविला आहे. राष्ट्रवादीने सिंधूदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणी कालच बरखास्त केली आहे. तसेच नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यानंतर आगामी काळात काय भूमिका असावी यासाठी केसरकर यांनी आपल्या समर्थकांची बैठक आज सावंतवाडीत आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रवादीतील नाराज लोकांनी झोडून हजेरी लावली. यावेळी बोलताना केसरकर यांनी निलेश राणेंना पराभूत कोकणातील दहशत कायमची संपवा असे आवाहन केले. दिवाळी साजरी करायची असेल तर नरकासूराचा वध करा. कोकणातील राडा संस्कृती मोडून काढणे हे आपले सर्वांचे कर्तृव्य आहे. आज आपल्याला जे मदत मागत आहेत तेच उद्या आपल्याला संपविण्याची भाषा करतील. तेव्हा सावध राहा आता आपल्याला ज्यांना हद्दपार करायचे आहे त्याच्याविरोधात बटन दाबावेच लागेल असे सांगत निलेश राणेंना पराभूत करण्यासाठी शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे केले.
पुढे वाचा, आव्हाड, पवारांची शिष्टाई गेली वाया...