आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातही आपल्या मालकीचे घर नाही : जितेंद्र आव्हाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आपण कुठल्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद नसून मुंबईतच नव्हे, तर महाराष्ट्रातही आपल्या मालकीचे घर नसल्याची साक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आदर्श सोसायटी घोटाळा चौकशी आयोगासमोर सोमवारी दिली.
निवृत्त न्यायमूर्ती जयपाल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील आयोगासमोर त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. आयोगाचे वकील दीपन मर्चंट यांनी त्यांना प्रश्न विचारले. त्यावेळी आव्हाड म्हणाले की, आपण सोसायटीचे सभासदत्व मिळवण्यासाठी 8 जून 2004 रोजी अर्ज केला होता. त्यापूर्वीच म्हणजे 20 एप्रिल 2004 रोजी आपण सोसायटीकडे पाच लाख रुपयांचा भरणा कसा केला, हे आपल्याला आठवत नाही. पण, 20 एप्रिल 2004 रोजी ही तारीख चुकीची छापण्यात आली असून वास्तविकरीत्या ही तारीख 20 आॅक्टोबर 2004 असायला हवी. कारण, पैशाचा भरणा केल्याबाबत सोसायटीकडून मिळालेली पावती याच तारखेची आहे. 'आदर्श'मध्ये फ्लॅटखरेदीसाठी आपण सोसायटीला 79 लाख 26 हजार 256 रुपये दिले. आव्हाड म्हणाले की, हा फ्लॅट मी स्वत:च्या नावावर खरेदी केला असून ‘जितनात इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.