आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ncp Mla Sandhyatai Kupekar Not Contesting Assembly Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर: चंदगडच्या राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकरांची विधानसभेतून माघार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- चंदगडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संध्याताई कुपेकर यांनी पुढील महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे पुतणे संग्राम कुपेकर हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविणार आहेत. दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांचे निधन झाल्यानंतर संध्याताई कुपेकर यांना पक्षाने पोटनिवडणुकीत तिकीट दिले होते. त्यात त्यांनी सुमारे 25 हजार मतांनी विजय मिळविला होता. मात्र, आता आपले वय पाहता त्यांनीच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
दीड वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी कुपेकर यांचे पुतणे असलेल्या संग्राम हे तिकीटासाठी आग्रही होते. मात्र, पवारांनी समजूत काढल्यानंतर संग्राम यांनी माघार घेतली होती. त्याचवेळी कुपेकर घराण्यात तिकीटावरून वाद उफाळला होता. कुपेकर घरात पूर्वीपासून होत आहे. संग्राम कुपेकर यांचे वडील भैय्या कुपेकर यांनी बंधू बाबासाहेब कुपेकर यांच्याविरोधात 1990 मध्ये बंडखोरी केली होती व त्यात विजयही मिळविला होता. पूर्ण चंदगड तालुका, गडहिंलग्ज व आजरा या तीन तालुक्यामधून हा विधानसभा मतदारसंघ बनला आहे.
मात्र, संध्याताई कुपेकर यांनी वाढते वय, प्रतिकूल परिस्थिती व पाठीशी कार्यकर्त्यांचे पुरेसे बळ नसल्याने निवडणुकीतून माघार घेतली आहे. याचबरोबर संग्राम यांचा मार्ग मोकळा झाला आहे. संध्याताई यांनी माघार घेतली नसती तर यावेळी संग्राम यांनी बंडखोरी केली असती असे बोलले जात होते.