आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेचा विरोध झुगारून विनायक मेटेंना महायुतीत प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसंग्राम संघटनेचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत महायुतीत प्रवेश केला. विशेष म्हणजे शिवसेना नेत्यांनी विरोध करूनही गोपीनाथ मुंडेंनी मेटेंना महायुतीत आणलेच. वांद्रय़ाच्या रंगशारदा भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, रिपाइं नेते रामदास आठवले व विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.

‘मराठा समाजाला आरक्षण तसेच शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत आघाडी सरकारने घोर निराशा केली. मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करणार्‍या आघाडी सरकारच्या उमेदवारांना पराभूत करा, असे आवाहन करत आपण राज्यभर फिरणार असल्याचे मेटे म्हणाले. शिवसेनेच्या अनेक नेत्यांचा मेटेंच्या महायुतीत प्रवेशाला विरोध होता. याबाबत मातोश्रीवर खास बैठकही झाली होती. मात्र शुक्रवारी अचानक सुत्रे फिरली आणि दुपारनंतर त्यांना महायुतीत सहभागी करून घेण्यात आले.

मेटेंचे स्वागत : मुंडे
महायुतीत मेटेंचे स्वागतच आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांनी तसेच संघटनांनी त्यांना समावून घेण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे, असे मुंडे म्हणाले. मेटे यांना प्रवेश मिळाल्यामुळे सर्वात जास्त आनंद मुंडे यांना झाला होता आणि तो त्यांच्या चेहर्‍यावरून तसेच बोलण्यातून दिसत होता.