पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपण पक्षाला व पक्षाध्यक्ष शरद पवारांना जुमानत नसल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटविण्याच्या मागणीमागे राष्ट्रवादी व पर्यायाने शरद पवार असतानाच खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री चव्हाण सर्वाधिक कार्यक्षम व कर्तबगार असल्याचे म्हटले आहे. शरद पवार, अजित पवारांपेक्षा चव्हाण हे उत्तम प्रशासक व अभ्यासू असे नेते आहे आहेत असा घरचा आहेर पक्षाला दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने मुख्यमंत्री बदलाची मागणी करू नये असेही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी एक पत्रक प्रसिद्ध करून निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, विधानसभेच्या निवडणुकीला जेमतेम दोन-तीन महिने राहिले असताना सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना बदलणे योग्य ठरणार नाही. नवा मुख्यमंत्री आल्यानंतर त्याला माहिती करून घेण्यास उर्वरित वेळ जाईल. त्यामुळे हा बदल उपयुक्त ठरणार नाही. मुख्यमंत्री चव्हाण यांना हटविण्यामागे कोणतेही ठोस कारण नसताना चुकीचा संदेश जनतेत जाईल. चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचे, प्रामाणिक नेते आहेत. गेली चार वर्षे ते उत्तम प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. व्यक्तिगत कामांपेक्षा ते समाजहितांच्या निर्णयाला ते प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांना हटविण्यापेक्षा त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादीने लढवाव्यत असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
उदयनराजेंबाबत आणखी पुढे वाचा...