आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी संजय पाटील?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईतील एकमेव खासदार असलेले संजय दीना पाटील यांची मुंबईच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले आमदार किरण पावसकर आणि पाटील यांच्यात या पदासाठी चुरस होती. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील पदाधिका-यांची मते जाणून घेतली. त्यानंतर संजय पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. या पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मुंबई शहराध्यक्षपदाची निवड दोन महिन्यापासून रखडली आहे. दोन महिन्यापूर्वी राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी मधुकर पिचड यांची फेरनिवड झाली होती.