आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCPकडून बिहार निवडणुकीसाठी चाचपणी, पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून पाटण्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन मंगळवारपासून पाटण्यात सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून िबहार िवधानसभा िनवडणुकीसाठी पक्षाच्या ताकदीची चाचपणी केली जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावर आपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्याचा राष्ट्रवादीचा हा एक मोठा प्रयत्न असेल.

लोकसभा िनवडणुकीमधील मोठ्या यशामुळे भाजपचा रथ सध्या वेगात धावत असून त्याला िबहारमध्ये रोखण्यासाठी काँग्रेससह सर्व समाजवादी पक्ष एकत्र आले असून या परिवारात सामील होऊन पवार मोदीवरोधी आघाडीत स्वत:ला सामावून घेतात की स्वत:चे अस्तित्व कायम ठेवून भाजपशी जुळवून घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
पाटण्यात १० जून रोजी राष्ट्रवादीचे अधिवेशन होणार आहे. या वेळी राज्यातील सर्व नेत्यांसह खासदार तसेच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार या अधिवेशनाला मंगळवारी तसेच बुधवारी मार्गदर्शन करतील. अधिवेशनाला येण्यापूर्वी पवार िबहारचे मुख्यमंत्री िनतीशकुमार तसेच माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची भेट घेणार आहेत.
िबहार िनवडणुकीच्या ताेंडावर िनतीशकुमार, लालू यांची आघाडी झाली असून या आघाडीत काँग्रेसही सामील झाली आहे.
लालू, नितीशकुमार यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत पवार त्यांच्या आघाडीत सामील होण्याचा अंितम िनर्णय घेणार नाहीत. मात्र, यािनमित्ताने ते समाजवादी पक्ष तसेच काँग्रेसची ताकद काय आहे याचा अंदाज घेतील. या आघाडीत सामील होऊन पवार आपला धर्मनिरपेक्षतावादी चेहरा जपण्याचा प्रयत्न करणार असले तरी पुढील चार वर्षे त्यांना केंद्र सरकारशी जमवून घ्यायचे असल्याने ते कुठलाही िनर्णय घेताना फारशी घाई करणार नाहीत, असे राजकीय िनरीक्षकांचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइडमध्ये, बिहारामध्ये भुजबळांची ताकद