आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP President Sharad Pawar Press Meet At Mumbai For BJP Support In Maharashtra

सरकार पडू नये म्हणून पाठिंबा, मतदानावर कोणी सल्ला देऊ नये, पवारांचा सेनेला टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील जनतेला स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे राज्यात स्थापन झालेले भाजपचे अल्पमतातील सरकार बहुमताअभावी पडू नये, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठिंबा देऊ केल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुनरुच्चार केला आहे. मात्र, भाजपला प्रत्येक मुद्यावरच पाठिंबा देऊ, असा त्याचा अर्थ होत नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्‍ट केले आहे.

भाजपला शिवसेनेने पाठिंबा दिला तर आम्हाला आनंदच होईल, मा‍त्र, शिवसेनेने जर भाजपला पाठिंबा दिला नाही तर राज्याला पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीने कोणाला मतदान करावे, असा सल्ला अन्य पक्षांनी आम्हाला देऊ नये, असे सांगत शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख यांनी रविवारी (9 नोव्हेंबर) घेतल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीवर केलेल्या ‍टिकेचाही शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला.

शरद पवार म्हणाले, राज्यात भाजपने अल्पमतात सरकार स्थापन केले आहे. सत्तेत असलेले सरकार बदलण्याचा राष्ट्रवादीला अधिकार नाही. मात्र, राज्यात अस्थिरता निर्माण होणार नाही, याविषयी राष्‍ट्रवादी काळजी घेणार आहे, अशी भूमिकाही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यात अस्थिरता येऊ नये म्हणून भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. आमच्याकडे कोणी पाठिंबा मागायलाही आलेले नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.तसे विधानसभेत आमची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणे योग्य नसल्याचे पवार म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'भगवा आतंकवाद'वर शरद पवारांचे स्पष्टीकरण...