आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP President Sharad Pawar News In Marathi, Mumbai

भपकेबाजपणा सोडा, जनतेमध्ये मिसळा; शरद पवारांकडून नेत्यांना कानपिचक्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘विधानसभेत आपले 62 आमदार आहेत. यापैकी फक्त 14 मतदारसंघांत लोकसभेसाठी मताधिक्य मिळाले, तर 48 मतदारसंघांत पिछाडी झाली. ही काळजी करण्यासारखी बाब असून मतदारांशी सुसंवाद करण्यात आपण कमी पडलो. आगामी विधानसभेसाठी आतापासूनच कामाला लागा. भपकेबाजपणा सोडून साधेपणाने लोकांमध्ये जा,’ अशा कानपिचक्या पक्षाध्यक्ष शरद पवारांनी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या.

चिंतन बैठकीच्या निमित्ताने पवार म्हणाले, ‘लोकांना नेत्यांबद्दल विश्वास वाटला पाहिजे. मात्र तसे होताना दिसले नाही. तरुण, महिला वर्ग आघाडी सरकारपासून दूर गेलेला दिसला. नवमतदारांना तर विश्वासच वाटला नाही. मात्र आता हातावर हात ठेवून चालणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून 15 वर्षे त्याच जिल्हा कार्यकारिण्या आहेत. त्यात बदल करायला हवेत. नेतृत्वाची नवी पिढी घडवायला हवी,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नेतृत्वही बदलायला हवे : ‘भाजपमध्ये राष्ट्रीय, राज्य, मुंबईतील अध्यक्ष दर दोन-तीन वर्षांनी बदलले जातात. या बदलामुळे नवनवीन लोकांना नेतृत्व करण्याची संधी मिळते. तसाच विचार आता आपण करायला हवा. नेतृत्वाची नवी फळी तयार करताना ज्यांचे पाय जमिनीवर आहेत त्यांना संधी दिली जाईल,’ असे पवार म्हणाले.