आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Pressurising Prithviraj Chavan For Not To Apologize On Behalf Of Ajit Pawar

अजित पवारांच्‍या वक्तव्‍यावर माफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर दबाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त करावी, या मागणीवर विरोधकांनी बुधवारी तिसर्‍या दिवशी विधानसभेचे कामकाज रोखले. राष्ट्रवादीच्या दबावामुळेच मुख्यमंत्री सभागृहात येत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करण्याचे मान्य केले होते. नंतर शब्द फिरवला. दिलगिरी व्यक्त करू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावर दबाव आणत आहे, असा आरोप खडसे यांनी केला. या मुद्द्यावरून विरोधक गोंधळ करू लागल्याने विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी कामकाज तहकूब केले.

अधिवेशन वाढवा : कामकाज सुरू झाले तेव्हा विविध विषयांवर चर्चेस वेळ मिळावा, यासाठी अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवावा, अशी मागणी खडसे यांनी केली. त्यावर हा प्रस्ताव चांगला असला, तरी त्यामागील हेतू तपासला पाहिजे. दोन दिवसांपासून विधानसभेचे कामकाज विरोधकांनी वेठीला धरले आहे, अशा शब्दांत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खडसे यांच्या मागणीला विरोध केला. पूर्वी जी माणसे चित्रविचित्र आणि उर्मटपणे वागायची, ती आता व्यवस्थित वागू लागली आहेत. हा दोन दिवसांतील कामकाजात झालेला बदल आहे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधार्‍यांना लगावला.

अजित पवारांविरुद्ध तक्रारीवर उद्या निर्णय
पुणे । अजित पवारांविरुद्धची तक्रार पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाने बुधवारी दाखल करून घेतली. त्यावर शुक्रवारी सुनावणी होईल.पवारांच्या प्रक्षोभक बोलण्याने जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी या तक्रारीत केली आहे.