आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Spokeperson Nawab Malik Wrote Letter To Cm Over Threat Calls, Sms

नवाब मलिकांना जीवे मारण्याची धमकी, कारवाई करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. भाजप समर्थकांकडून आपल्याला गेल्या दीड वर्षापासून फोनद्वारे शिवीगाळ करणे, धमकीचे एमएमएस पाठवणे तसेच रात्री अपरात्री फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत अशी तक्रार मलिक यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला धमकी देणारे संबंधित लोक हे काही मंत्र्यांचे समर्थक व कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रवक्ता या नात्याने प्रसिद्धी माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडणे हे माझे कर्तव्य आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयावर किंवा सरकारच्या कामकाजावर पक्षाची भूमिका मांडून विरोधी पक्षाची जबाबदारी मी पार पाडीत आहे. तुमच्या सरकारने किंवा एखाद्या मंत्र्याने चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याविरोधात पक्षाची अधिकृत भूमिका मांडणे गरजेचे असते. मात्र, अशी भूमिका मांडली की मला संबंधित मंत्र्याच्या समर्थक, कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे शिवीगाळ करणे, धमकीचे एसएमएस पाठवणे व रात्री अपरात्री फोन करून जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली आहे. मला वारंवार जीवे मारण्याची धमकी देणा-या लोकांवर आपण योग्य ती कारवाई करावी व भविष्यात असे कृत्य घडणार नाही याची काळजी घ्याल अशी आशा आहे असे मलिक यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.
पुढे वाचा, नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र...