आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांदेपालट: पिचड आदिवासी, शिंदेना जलसंपदा तर सोपल यांना पाणीपुरवठा खाते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याच्या मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची मंगळवारी खांदेपालट करण्यात आली. नव्या सहा चेहर्‍यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. राजभवनावर शपथविधी होऊन लागलीच खातेवाटपही करण्यात आली आहे.

पक्षकार्यातून मधुकर पिचड यांना मुक्त करण्‍यात आले असून त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी मधुकर पिचड (अकोले), शशिकांत शिंदे (सातारा) आणि दिलीप सोपल (बार्शी) यांना कॅबिनेट मंत्रीपदाची तर उदय सामंत (रत्नागिरी), संजय सावकारे (भुसावळ), सुरेश धस (आष्‍टी) यांना राज्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कार्यक्रमाला मुख्‍यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.

नव्या मंत्र्यांचे खातेवाटप-
कॅबिनेट दर्जा
मधुकर पिचड- आदिवासी विकास
शशिकांत शिंदे जलसंपदा (कृष्णा खोरे)
दिलीप सोपल- पाणी पुरवठा मंत्री

राज्यमंत्री
संजय सावकारे - परिवहन, कृषी राज्यमंत्री
उदय सामंत- नगरविकास राज्यमंत्री
सुरेश धस- महसुल राज्यमंत्री

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादीने हे फेरबदल केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने काही मंत्र्यांना बाजूला करून संघटनेत काम करण्यासाठी पाठवले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी काही नव्या चेहर्‍यांनाही पुढे आणले आहे.

या मंत्र्यांना वगळलं
बबनराव पाचपुते (आदिवासी कल्याणमंत्री)
गुलाबराव देवकर (परिवहन राज्यमंत्री)
रामराजे निंबाळकर (जलसंपदा मंत्री)
लक्ष्मण ढोबळे (पाणी पुरवठा मंत्री)
भास्कर जाधव (नगरविकास राज्यमंत्री)
प्रकाश सोळंके (महसूल राज्यमंत्री)

'शपथविधी'वर विरोधकांचा बहिष्कार
राज्याच्या मंत्रिमंडळात राष्‍ट्रवादी काही फेरबदल केले आहेत. परंतू या फेरबदलावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे विरोधकांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. विरोधक शपथविधी सोहळ्याला अनुपस्थीत होते.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यादी घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर गेले होते. नव्या बदलात आदिवासी कल्याणमंत्री बबनराव पाचपुते, जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, राज्यमंत्री भास्कर जाधव, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची गच्छंती झाली होती.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या शुक्रवारी पक्षाच्या 20 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले होते. यातील पाच जणांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सादर करून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवले जातील, असे सूत्रांनी म्हटले आहे. याबाबत अजित पवार यांनी पत्र पाठवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अकार्यक्षम व भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना वगळण्यात आल्याचेही आधीच समजले होते.

पवार, भुजबळ, नाईक जागेवरच : उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक आदी ताकदवर नेत्यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम राहणार आहे.

राष्‍ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नावही स्पर्धेत असल्याचे काही नेते म्हणतात. आर.आर. याआधी प्रदेशाध्यक्ष होते. जयंत पाटील यांचा मंत्रिपदाचा अनुभव मोठा आहे. तथापि, तरुण चेह-याला संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे.