आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Will Fight For 5 % Muslim Reservation In State Ncp

गोवंश हत्येविरोधात नव्हे हक्काचे आरक्षण हीच मुस्लिमाची खरी लढाई- राष्ट्रवादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुस्लीम समाजाची लढाई ही गोवंश हत्येविरोधात नसून ही लढाई 5 टक्के हक्काच्या आरक्षणासाठी असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. मुस्लीम समाज बांधवांच्या हक्काचे 5 टक्के आरक्षण त्यांना मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. मुस्लिमांच्या न्याय्य हक्‍कांचे संरक्षण करणारा राष्ट्रवादी हा एकमेव राजकीय पक्ष असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे राष्टीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने रविवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुस्लिम आरक्षण संमेलन घेण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार तारिक अन्वर, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे राष्टीय अध्यक्ष सय्यद जलालुद्दीन यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच धर्मनिरपेक्ष विचारावर चालत आला आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षात सर्व जाती-धर्माच्या लोकांना समान संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे. मुस्लीम समाजाची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन शरद पवार साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी एक अल्पसंख्याक विभाग सुरू करण्याची सूचना केली होती आणि त्यानुसार राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर अल्पसंख्याक विभाग सुरू करण्यात आला होता. या विभागाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा विकासावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. मी स्वतः अर्थमंत्री असताना मौलाना आझाद महामंडळाचे भाग भांडवल 25 कोटी रुपयांवरून 100 कोटी इतके वाढविले होते. शरद पवार साहेबांनी मुस्लीम समाजातील गरीब घटकांना देखील आरक्षण दिले गेले पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यानुसार आघाडी सरकारने मुस्लीम समाजास शिक्षण आणि नोकरीमध्ये 5 टक्के देण्याचा निर्णय घेतला. पुढे उच्च न्यायालयाने त्यापैकी शिक्षणाचे आरक्षण मान्य केले. परंतु नव्याने सत्तेत आलेल्या भाजपा सरकार हे आरक्षण मुस्लिमांना मिळू दिले नाही. भाजपा सरकार हे जातीयवादी असून भाजपा सरकारची मुस्लीम समाजाच्या बाबतीत नियत साफ नाही, असा आरोपही तटकरेंनी केला.
पुढे वाचा, नवाब मलिक व सय्यद जलालुद्दीन यांनी मुस्लिमांबाबत काय भूमिका मांडली आहे....