आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा वाघ यांनी चर्चगेट रेल्वे कार्यालयाला ठोकले टाळे, महागाईविरोधातही राज्यभर एल्गार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरम्यान, आजपासून संपूर्ण राज्यभर महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या एल्गार आंदोलनास सुरुवात झाली आहे. - Divya Marathi
दरम्यान, आजपासून संपूर्ण राज्यभर महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या एल्गार आंदोलनास सुरुवात झाली आहे.
मुंबई- एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी रेल्वे अधिकारी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली. एल्फिन्स्टन- परळ चेंगराचेंगरीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज चर्चगेट स्थानक येथे 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पश्चिम रेल्वेच्या महासंचालकांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. दरम्यान, आजपासून संपूर्ण राज्यभर महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या एल्गार आंदोलनास सुरुवात झाली आहे.
 
"मुंबई की जनता रो रही है, रेल्वे प्रशासन सो रहा है", "अच्छे दिन गये तेल में, जनता पीस रही रेल में" अशी जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या महिलांनी चर्चगेट स्थानक दणाणून सोडले. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी रेल्वे अधिकारी आणि रेल्वेमंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनाचे नेतृत्व चित्रा वाघ यांनी केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, नगरसेविका मनिषा रहाटे, माजी नगरसेविका रत्ना महाले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, चित्रा वाघ यांनी मुंबईत चर्चगेटबाहेर केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...