आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Working President Jitendra Awhad Critics On Modi

शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे संदर्भ देणाऱ्या नरेंद्र मोदींनी माफी मागावी- जितेंद्र आव्हाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राचा जानता राजा अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजरातमध्ये चुकीच्या पद्धतीने पसरविला जात असल्याबद्दल राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला आहे.
याबाबत आव्हाड यांनी म्हटले आहे की, शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला जातो असे नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी रायगड येथील भाषणात सांगितले होते. शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल खंत वक्त करणाऱ्या याच मोदींच्या गुजरात सरकारकडून मात्र महाराज्यांचा चूकीचा इतिहास पसरविला जात आहे. गुजरातच्या शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म 1603 रोजी शिवनेरी राजवाड्यात झाला असून, त्यांना धार्मिक शिक्षण देणारे दादोजी कोंडदेव हे त्यांचे आजोबा होते असे म्हटले आहे. गुजरात सरकार पाठ्यपुस्तकाव्दारे शिकवत असलेल्या या चुकीच्या इतिहासाचा आम्ही निषेध करतो, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
आव्हाड म्हणाले, खरे तर शिवाजी महाराजांचा जन्म हा 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. एक वेळ या चुका क्षम्य असल्या तरी ज्यांचे शिवाजी महाराजाच्या कुटुंबाशी दुरान्वयेही नाते संबंध नव्हता अश्या दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांचे आजोबा असल्याचे म्हणणे म्हणजे द्रोह आहे. मात्र राज्याच्या नेतृत्वाचाच इतिहास कच्चा असल्यावर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आत्ता पर्यंत केवळ जाहिर सभांमधून खोटे बोलत होते हे सारा देश पाहत आहे. पण आता तर गुजरातच्या शाळांमधूनही मोदी खोटा इतिहास शिकवायला निघालेले आहेत. महाराष्ट्राच्या मानबिंदूंचा अपमान करणारे कुठलेही विधान कदापी सहन केले जाणार नाही. गुजरात सरकारच्या या तालीबानी शिक्षण पध्दतीचा आणि ती शिकवणाऱ्या हिटलरशाही प्रवृत्तींचा आम्ही जाहीर आणि तीव्र निषेध करतो. महाराजांबद्दल चुकीचे संदर्भ देणाऱ्या मोदिंनी शिवभक्तांची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.