आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षीरसागर, मुख्यमंत्र्यांत बीडमध्ये ‘गुफ्तगू’! भाजप प्रवेशाची चर्चा, पंकजाही उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज सकाळी जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्यावर नाष्ट्यासाठी पोहचलेले देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे.... - Divya Marathi
आज सकाळी जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्यावर नाष्ट्यासाठी पोहचलेले देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे....

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्षित असलेले अामदार जयदत्त क्षीरसागर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी बीडमध्ये बंद खाेलीत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. क्षीरसागरांच्या बंगल्यावरच मुख्यमंत्र्यांनी पाहुणचारही घेतला. त्यामुळे अामदार क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा वेग अाला अाहे.


शुक्रवारी बीडच्या दाैऱ्यावर अालेल्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईहून येतानाच क्षीरसागरांना अापल्यासाेबत अाणले हाेते.  मुंबई ते अाैरंगाबाद विमानाने व अाैरंगाबाद ते बीड हेलिकाॅप्टरने त्यांनी प्रवास केला. त्यानंतर क्षीरसागर यांनी फडणवीसांना थेट अापल्या बंगल्यावर नेऊन पाहुणचार केला. त्यांच्यासाेबत पालकमंत्री पंकजा मुंडे, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे पण उपस्थित हाेते. या वेळी फडणवीस व क्षीरसागर यांनी बंद खोलीत  जवळपास अर्धा तास चर्चा केली. 


दरम्यान, या भेटीत काेणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे क्षीरसागरांकडून सांगण्यात येत असले तरी जिल्ह्यात क्षीरसागरांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगू लागली अाहे. राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात अालेले माजी मंत्री सुरेश धस हेही लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची शक्यता अाहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंदर्भातील फोटोज व ताज्या घडामोडी...

बातम्या आणखी आहेत...