आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP's State President Selection Tope, Walse In List

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद; टाेपे, वळसे, शिंदे शर्यतीत, निवड २९ एप्रिलच्या बैठकीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग अाला अाहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नावे या पदासाठी आघाडीवर असून माजी मंत्री राजेश टोपे हेही अखेरच्या क्षणी डॉर्क हाॅर्स ठरू शकतात, अशीही चर्चा आहे.

सध्या राष्ट्रवादीत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी तीन प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया सुरू अाहे. या प्रतिनिधींची बैठक २९ एप्रिल रोजी मुंबईत हाेणार अाहे. याच बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी २६ एप्रिल रोजी निवडक नेत्यंाची बैठक बोलावली जाणार असून त्यातही नावांबाबत चर्चा हाेणार अाहे. वळसे- पाटील हे उत्तम संघटक असून पक्ष मजबूत करणे आणि भविष्यातील निवडणुका यांच्याबाबत ते उत्तम नियोजन करू शकतात. शरद पवारांचे निकटस्थ असलेले वळसे यांच्या नावावर पक्ष पातळीवर विचार सुरू आहे. मात्र, त्यांच्या ज्येष्ठतेमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये ते सहजपणे मिसळतील का, याबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील अाक्रमक नेते म्हणून अाेळखले जातात. राष्ट्रवादी हा पक्ष प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने शिंदे यांच्या निवडीचा लाभ पक्षाला मिळू शकतो. शिंदे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.

सर्वच पक्षांचे प्राधान्य मराठवाड्याला ?
राजेश टोपे हे तरुणांशी सहज संवाद साधू शकतील, असे नेते आहेत. शरद पवार व अजित पवार या दाेघांशीही त्यांचे उत्तम संबंध आहेत. भाजप, काँग्रेसने आपले प्रदेशाध्यक्ष मराठवाड्यातील निवडल्याने राष्ट्रवादीही या भागात पक्ष मजबूत करण्यासाठी टाेपेंना संधी देऊ शकते, अशी चर्चा अाहे.