आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षानंतर भारताची युद्धनौका समुद्री टेहाळणीवर, चीन- पाकवर ठेवणार नजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 वर्षानंतर भारताची युद्धनौका समुद्री टेहाळणीवर गेली आहे. - Divya Marathi
16 वर्षानंतर भारताची युद्धनौका समुद्री टेहाळणीवर गेली आहे.
मुंबई- नौसेनेची स्कार्पीन कॅटेगरीतील सहा सबमरीनपैकी (युद्धनौका) पहिली आयएनएस कल्वरी ही मुंबईतील समुद्रात टेस्टिंगसाठी पाठविण्यात आली. चीन, पाकिस्तानच्या समुद्र हद्दीत नजर ठेवण्यासाठी कल्वरी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. सध्या कल्वरीवर वजनदार टॉरपीडो नेण्यात येणार नाही. सप्टेंबरअखेरपर्यंत ते नौसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे.
डिझेल-इलेक्ट्रिक पावरवर चालते कल्वरी-
- डिझेल-इलेक्ट्रिक पावरवर चालणारी कल्वरी 66 मीटर लांब आहे.
- कल्वरी रविवारी मुंबई समुद्रकिना-यावरून मार्गस्थ झाली.
- 2015 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत माझगांव डॉकयॉर्डमधून तिला समुद्रात सोडले होते.
- कल्वरीची निर्मिती आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. याच प्रकारातील आणखी 5 यु्द्धनौका आगामी 9 महिन्याच्या काळात समुद्रात सोडल्या जातील, असे नौसेना अधिका-याने सांगितले.
- ऑक्टोबर 2005 मध्ये संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सची कंपनी डीसीएनएससोबत केलेल्या 3.6 अब्ज डॉलर कराराचे हे फलित आहे.
- या प्रकारातील आणखी 5 युद्धनौका डीसीएनएसच्या मदतीने भारत बनवत आहे.
- भारत आणखी दोन युद्धनौका बनविण्याच्या विचारात आहे. भारताच्या नौदलाकडे सध्या 14 युद्धनौका आहेत.
काय म्हणाले नौदल प्रमुख?
नौदलप्रमुख आर के धवन यांनी सांगितले की, युद्धनौकेसाठी जास्त वजनासाठी टॉरपीडो खूप महत्त्वाचे असते. नौदलाच्या अथक प्रयत्नानंतरही टॉरपीडो मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. आम्ही त्यासाठी आणखी प्रयत्नशील आहे.
भारताला युद्धनौकांची का गरज आहे?
- पाकिस्तान, चीन यांच्यापासून धोका पाहता भारताकडे आधुनिक युद्धनौकांची गरज आहे.
- कल्वरी एंटी शिप मिसाईल SM-39 डागण्याची क्षमता राखून आहे.
- मात्र, सध्या तरी कल्वरीवर जड टॉरपीडो (युद्धनौकेतून वाहून नेण्यात येणारे मोठे क्षेपणास्त्र) घेऊन जाणे शक्य नाही.
- सूत्रांच्या म्हणण्यानुसार सध्या कल्वरी म्हणजे गोळीशिवाय असलेली बंदूक आहे.
- इटलीकडून 1800 कोटींची 'ब्लॅक शार्क' टॉरपीडो खरेदीचा प्रकरण हेलिकॉप्टर डीलमुळे अडकले आहे.
- ब्लॅक शार्क टॉरपीडो सप्लाई फिनमॅक्केनिकाचीच एक कंपनी 'व्हाइटहेड एलेनिया सिस्टेमी सबएक्वल' करणार आहे.
का अडकला आहे ब्लॅक टॉरपीडोचा मुद्दा?
- जर्मन कंपनी एटलस इलेक्ट्रिकने भारतात ब्लॅक शार्कची निवड केल्याच्या प्रक्रियेची तक्रार केली आहे.
- भारताने जर्मनीच्या 'सीहेक टॉरपीडो'च्या जागेवर इटलीची 'ब्लॅक शार्क' निवडली होती.
- जर्मनीच्या तक्रारीनंतर याच्या चौकशीसाठी एक तांत्रिक समिती नियुक्त केली होती.
- ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर डीलचा मुद्दा तापल्यानंतर पुन्हा एकदा 'ब्लॅक शार्क' ची प्रक्रियेला खीळ बसली आहे.
बातम्या आणखी आहेत...