आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्‍हा नीता अंबानी यांनी धीरूभाईंना उद्धट बोलत कापला होता फोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील सर्वात श्रीमंत व्‍यक्‍तीची पत्‍नी असलेल्‍या नीता अंबानी यांचा येत्‍या 1 नोव्‍हेंबरला त्‍यांचा वाढदिवस आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com अंबानी कुटुंबाविषयी काही रंजक गोष्‍टी सांगणार आहे. त्‍यातील पहिला भागात सांगणार आहोत नीता अंबानी यांनी आपले सारसे धीरूभाई यांना उद्धट उत्‍तर देत त्‍यांचा फोन कापला होता, या विषयी...
का बोलल्‍या नीता उद्धट
मुंबईमध्‍ये नवरात्री उत्‍सवानिमित्‍त आयोजित एका कार्यक्रमात नीता यांनी भरतनाट्यम सादर केले. या कार्यक्रमाला धीरूभाई अंबानीसुद्धा उपस्‍थ‍ित होते. त्‍यांना नीता यांचे नृत्‍य खूप आवडले. त्‍यांनी त्‍याच कार्यक्रमात मुकेश यांच्‍यासाठी नीता यांना पसंत केले आणि घरी जाताच नीता यांचा फोन केला आणि म्‍हटले, '' मी धीरूभाई अंबानी बोलतोय'', हे ऐकताच नीता यांनी ''रॉंग नंबर'' म्‍हणत फोन कट केला. त्‍यावर पुन्‍हा धीरूभाई यांनी कॉल केला. नीता यांना वाटले की, धीरूभाईंच्‍या नावाने कुणीतरी आपल्‍यासोबत मस्‍करी करत आहे. त्‍यामुळे चिडून जावून त्‍या त्‍यांना म्‍हणाल्‍या, ''तुम्‍ही धीरूभाई असाल तर मी एलिजाबेथ टेलर आहे...'', असे म्‍हणून त्‍यांनी फोन कट केला.
धीरूभाई अंबानी यांनी ऑफिसमध्‍ये बोलावून घेतले
नीता यांनी दोन वेळा फोन कट केल्‍यानंतरही धीरूभाई यांनी तिसऱ्या वेळी त्‍यांना फोन केला. यावेळी नीता यांच्‍या वडिलांनी फोन घेतला. त्‍यांनी धीरूभाईचा आवाज ऐकताच नीता यांच्‍याकडे फोन दिला आणि सोज्‍वळपणे बोलण्‍याचे सांगितले. नीता यांनी फोन घेतला आणि म्‍हटले, "जय श्री कृष्ण." त्‍यावर धीरूभाई यांनी नीता यांना कार्यक्रमाला येण्‍याचे सांगितले. ते ऐकून नीता घाबरल्‍या. पण, एवढा मोठा व्‍यावसायिक आपल्‍याला का भेटू इच्छितो हे जाणून घेण्‍यासाठी त्‍या आपल्‍या वडिलांसोबत कार्यालयात गेल्‍या.
मुकेशला भेटायला आवडेल का...
कार्यालयात पोहोचल्‍यानंतर धीरूभाई आणि नीता यांच्‍यात गप्‍पा सुरू झाल्‍या. धीरूभाईंनी त्‍यांना विचारले, ''तू काय करतसे, तुला काय आवडते ?'' काही वेळानंतर विचारले '' माझा मुलगा मुकेशला भेटणे तुला आवडेल का," त्‍यावर नीता यांनी होकारार्थी उत्‍तर दिले. नीता सांगतात की, मुकेश आणि त्‍यांच्‍यामध्‍ये धीरूभाईंनी मॅचमेकरची भूमिका पार पडली.

पुढील स्लाइड्सवर पाहा नीता अंबानी यांचे निवडक PHOTOS....