आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानी व मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मुलांसोबत अशी केली मस्ती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मुंबई इंडियन्स टीमचे आयपीएलच्या आठव्या हंगामात पहिल्याच सलग तीन पराभव झाले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे खेळाडू निराश आहेत. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी संघाच्या मालकीन नीता अंबानी यांनी शक्कल लढवली. बुधवारी लोअर परेल भागात नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्स टीमसोबत अनाथ मुलांच्या आश्रमात गेल्या. तेथे त्यांनी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रोजेक्ट एज्युकेशन फॉर ऑल या अंतर्गत नीता अंबानी व एमआयच्या खेळाडूंनी भरपूर आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या वेळी नीता अंबानी स्टेजवर चढल्या तेव्हा त्यांना मुलांनी वेढाच घातला. तेव्हा नीता अंबानी यांनी एका लहानग्याला थेट उचलून आपल्या पोटावर घेतले व त्याला केक चारला. क्रिकेटर हरभजन सिंह आणि रोहित शर्मा यांनीही मुलांसोबत मस्ती केली व तर हरभजनने सेल्फी घेतल्या. तर, लसिथ मलिंगा आणि केविन पोलार्ड यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, नीता अंबानी व मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी कशी केली मस्ती, पाहा त्याचे PHOTOS...