आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Negative Comment On Social Network Sites On Sharad Pawar

शरद पवार यांच्याविरोधात सोशल नेटवर्कवर आक्षेपार्ह मजकूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोशल नेटवर्क साईटवर कृषिमंत्री शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकणार्‍या तरुणाच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
सोशल नेटवर्कच्या माध्यमातून राजकीय नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली जात असल्याची प्रकरणे या पूर्वीही घडली होती. सोशल नेटवर्क साईटवर मराठा आरक्षणावरून कृषिमंत्री शरद पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे पवार यांच्या छायाचित्रावर सदर तरुणाने फुली मारली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नेरूळ गावातील प्रवीण मिसाळ या तरूणाने हा मजकूर टाकला असल्याचे पुढे आले. त्यानंतर या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.