आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 53 जणांसाठी हा ठरला देवदूत, नेहरेच्‍या पुरातून केली पर्यटकांची सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाड येथील दुर्घटनेत शेकडो लोकांचे प्राण वाचवणारा बसंत कुमार नावाचा देवदूत आपण पाहिला, असेच कौतुकास्‍पद कार्य केले आहे मुंबईतील एका देवदुताने. सहलीसाठी गेलेल्‍या 53 पर्यटकांची सुटका करणा-या या देवदुताचे नाव आहे रमेश मिश्रा.

- रमेश आणि त्‍याचे मित्र पनवेलजवळील नेहरे धबधब्यावर गेले होते.
- दरम्‍यान, डोंगरावर पावसाचा जोर वाढल्‍यामुळे पाण्याची पातळीही काहीं क्षणातच वाढली.
- यावेळी आलेल्‍या पुरामध्‍ये 53 पर्यटक अडकले.
- महिला आणि लहान मुलं जीवाचा आकांत करून मदत मागत होते.
- पाण्याची पातळी आणि प्रवाह पाहून पर्यटकांना वाचवण्‍याची कुणीही हिंमत दाखवली नाही.
- रमेशने क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली.
- पुरात अडकलेल्याना त्याने एक एक करून बाहेर काढले.
- रमेशचे हे धैर्य पाहून त्याचे मित्रदेखील त्याच्या मदतीला आले.
- पुरातून सुखरूप वाचलेल्‍या 53 पर्यटकांसाठी रमेश देवदूत ठरला आहे.
- येणा-या स्‍वातंत्र्यदिनी काही सामाजिक संघटनांनी रमेशचा सत्‍कार करण्‍याचे जाहीर केले आहे.
काय म्‍हणाला रमेश..
रमेश म्‍हणाला की, याआधीही या ठिकाणी मी आलो होतो. त्यामुळे मला येथील पाणी आणि प्रवाहाचा अंदाज होता. शिवाय मी मी पट्टीचा पोहणारा असल्यामुळे मला पाण्याची भीती वाटत नाही. 53 जण पुरात अडकल्‍याचे पाहून मी स्‍वत:ला आवरू शकलो नाही. त्‍यांना सुखरुप बाहेर काढल्‍याचे समाधान वाटते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, घटनेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...