आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नेल्सन मंडेला यांच्या निधनाने जगाने 'दुसरा गांधी' गमावला'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महात्मा गांधी यांच्यानंतर त्यांच्या विचारांचा वारसा जगभर खऱ्या अर्थाने पोहचणा-या आणि मानवमुक्तीचा ऐतिहासिक लढा उभारणा-या नेल्सन मंडेला यांच्या निधनाने जगाने 'दुसरा गांधी' गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. दक्षिण आफ्रीका आणि भारताने वर्णभेदविरोधी संघर्ष अनुभवलेला आहे. मंडेला यांच्या सामाजिक समतेच्या चिरंतन विचारावर अधिष्ठित राष्ट्र उभारणी करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.
आधुनिक काळात माणसा-माणसातील अंतर व संघर्ष वाढत चालला आहे. दहशतवादाची व शोषणाची नवनवीन रुपे समोर येत आहेत. जगामध्ये पुन्हा एकदा समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची प्रस्थापना करणे आवश्यक झाले आहे. अशा काळात नेल्सन मंडेला यांचे जीवन आणि त्यांनी दिलेला लढा नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे, असे मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात. महात्मा गांधींचा देश म्हणून नेल्सन मंडेला यांना भारताविषयी विशेष जिव्हाळा होता. सामाजिक समतेसाठी आयुष्यभर संघर्ष करणा-या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनीच मंडेलांचे आपल्यातून निघून जाणे विशेष चटका लावून जाणारे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.