आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅल्बी लावण्यासाठी काकाच्या घरातून चाेरले अडीच लाखांचे दागिने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अापल्या गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डाॅल्बी सिस्टिम लावण्यासाठी एका तरुणास पैशाची अावश्यकता हाेती. साथीदाराच्या मदतीने त्याने अापल्या काकाच्या घरीच डल्ला मारून दाेन लाख ५३ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने पळविले. याप्रकरणी पाेलिसांनी भारत किसन पवार (१९, रा. शुक्रवार पेठ, पुणे) या अाराेपीस अटक केली, तर या चाेरीत त्याला मदत करणारा साथीदार मात्र फरार अाहे.

सारिका अमरसिंह पवार या महिलेने अापल्या घरातील दागिन्यांची चाेरी झाल्याची तक्रार फरासखाना पाेलिस ठाण्यात दाखल केली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी पवार यांच्या घरी जाऊन तपासणी केली. त्यांच्या घरातील अल्पवयीन मुलांकडेही चाैकशी केली तेव्हा माहितगार व्यक्तीनेच हे दागिने चाेरले असल्याचा संशय बळावला. त्यामुळे पाेलिसांनी सारिका यांचा पुतण्या भारत पवारला ताब्यात घेऊन चाैकशी केली. पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने चाेरीची कबुली दिली.

भारतला अापल्या गणेश मंडळाची मिरवणूक पुण्यातील मुख्य विसर्जन मार्गावरून म्हणजेच लक्ष्मी राेडने न्यायची हाेती. त्यासाठी डाॅल्बी सिस्टिमही लावायची हाेती. मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. ही गरज भागवण्यासाठी भारतने सारिका यांच्या लहान मुलाकडे घरातील पैसे व दागिने कुठे ठेवतात याबाबत चाैकशी केली. अजाणतेपणे त्याने माहिती दिल्यावर या मुलास घराच्या खाली थांबवून भारत व त्याच्या साथीदाराने सारिका यांच्या घरातील वरच्या मजल्यावर जाऊन लाेखंडी शाेकेसमध्ये ठेवलेले अाठ ताेळे वजनाचे दाेन लाख ५३ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने चाेरून नेले हाेते. अाराेपीने कबुली दिल्यानंतर पाेलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता एक लाख ८४ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने सापडले. उर्वरित दागिने त्याने कुणाला विकले याचा शाेध पाेलिस घेत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...