आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छेडछाड प्रकरण : जबाब नोंदवण्यासाठी प्रीती झिंटा मुंबईत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची सहमालकीण प्रीती झिंटा रविवारी अमेरिकेहून मुंबईत दाखल झाली. पूर्व प्रियकर नेस वाडियाविरोधात केलेल्या तक्रारीबाबत येत्या दोन दिवसांत ती पोलिसांकडे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.

30 मे रोजी वानखेडे स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये सामना सुरू असताना नेस वाडियाने आपली छेडछाड केल्याची तक्रार प्रीतीने पोलिसांत दाखल केली होती. विशेष म्हणजे ही घटना घडल्यानंतर बारा दिवसांनी प्रीतीने तक्रार केली होती व त्यानंतर लगेचच ती काही खासगी कामासाठी लॉज एंजलिसला निघून गेली होती. दरम्यान, आता प्रीती काय जबाब देते यावर या प्रकरणाचे भवितव्य आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुंबई विमानतळावरील प्रीतीची आणखी छायाचित्र