आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिता बिजनेस टायकून तर आई 'ग्लॅडरॅग्स'ची मालकीण, अशी आहे नेस वाडियाची फॅमिली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रीती झिंटा आणि नेस वाडियाचे 2009 मध्ये झालेले ब्रेकअप खूपच गाजले होते. - Divya Marathi
प्रीती झिंटा आणि नेस वाडियाचे 2009 मध्ये झालेले ब्रेकअप खूपच गाजले होते.
मुंबई- देशातील सर्वात मोठे उद्योगपती घराणे वाडिया फॅमिलीतील दीना (Dina) वाडिया यांचे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे गुरुवारी निधन झाले. त्या 98 वर्षाच्या होत्या. दीना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची एकुलती एक मुलगी होती. वाडिया परिवारातील सर्वात यंग जेनरेशनचे सदस्य नेस वाडिया यांची ती पणजी होती. असे आहे अब्जाधीस उद्योगपतीचे घराणे...
 
- नेसचे पिता नुस्ली 'वाडिया ग्रुप्स' कंपनीचे मालक आहेत. त्याची आई मौरीन वाडिया फॅशन मॅगझीन ग्लॅडरॅग्सची मालकीण आहे. तिने मॅनहंट कॉंन्टेस्ट आणि ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल सारख्या कॉम्पिटीशन्सची सुरुवात केली. 
- वाडिया ग्रुपच्या कंपन्यांत करोडोत टर्नओवर असलेली ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा समावेश आहे. सोबत बॉम्बे डाईंग सारख्या विख्यात कंपनी सुद्धा त्यांचीच आहे.
- देशातील टॉप एयरलाईन्समध्ये 'गो एयरलाइंस' वाडिया ग्रुपची आहे. या कंपनीचा कारभार नेसचा छोटा भाऊ जेह वाडिया पाहतो.  बॉलिवूड अॅक्ट्रेस प्रीती झिंटा या एयरलाईन्सची ब्रॅंड अॅम्बेसडर राहिली आहे. 
 
जिनाच्या विरोधात जाऊन केले होते दीनाने लग्न- 
 
- जिनाची एकुलती एक मुलगी दीना वाडियाच्या कुटुंबात त्यांचा मुलगा नुस्ली एन वाडिया, मुलगी डायना एन वाडिया आहे. नेस आणि जेह वाडिया त्याचे पणतू आहेत. दीनाचा जन्म 15 ऑगस्ट 1919  रोजी झाला होता. 
- जिनाचा विरोध झुगारून दीनाने मुंबईतील पारसी वाडिया परिवारातील नेविल यांच्यासोबत लग्न केले होते. 1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानात न जाता भारतात राहणे पसंत केले. मात्र, सध्या त्या अमेरिकेत राहत होत्या.
- जिनाच्या निधनानंतर त्या पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यानंतर त्या 2004 मध्ये एकदा पाकिस्तानात गेल्या होत्या.
 
नेसचे प्रीती झिंटासोबत होते संबंध-
 
- प्रीती झिंटा आणि नेस वाडियाचे 2009 मध्ये झालेले ब्रेकअप खूपच गाजले होते. 
- नेस वाडिया आयपीएल टीम Kings XI पंजाबचा को-ओनर आहे. तर, प्रीती झिंटा सुद्धा या टीमची पार्टनर आहे. 
- सलमान खानपासून ते सैफ अली खान आणि करण जोहरसारख्या अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीजसोबत नेसचे उत्तम संबंध राहिले आहे.
- पारशी परिवारांना मदत करण्यासाठी वाडिया फॅमिली मुंबईत 'नोरोजी नूसीरवानजी वाडिया ट्रस्ट आणि रुस्तूम जी नोरोजी नावाचा ट्रस्ट चालवतात
- याशिवाय वाडिया ग्रुपचे पुण्यात वाडिया कॉलेज, नेस वाडिया फाउंडेशनसारखी ऑर्गनायजेशनचा समावेश आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज.....
बातम्या आणखी आहेत...