आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nestle Company Goes In Mumbai Highcourt Againest FASSAI Ban On Maggi

सरकारला आव्हान: मॅगीच्या बंदीविरोधात नेस्ले इंडियाची मुंबई हायकोर्टात धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रासह भारताची राजधानी दिल्लीव उर्वरित 11 राज्यांत नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्सवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले इंडियाने आज मुंबई हायकोर्टात धाव घेतली. केंद्र सरकारच्या विविध राज्यांच्या अन्न व औषध प्रशासनाने घातलेली बंदी अयोग्य आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FASSAI) या संस्थेने मॅगीच्या विविध 9 नमुन्यांची तपासणी केल्याचे म्हटले आहे. माचा त्याचा आम्हाला दिला नाही. ही तपासणी कशाच्या आधारावर केली याची माहिती आम्हाला मिळायला हवी असे नेस्लेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
नेस्ले कंपनीच्या मॅगीमध्ये एमसीजी व शिसे हे घातक पदार्थ आढळल्याने मॅगीवर दिल्ली आणि महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 5 जून रोजी मॅगी नूडल्सवर बंदी घातली. शिवाय एफएएसएसएआयने याबाबत मॅगीला नोटीस जारी करुन 15 दिवसांत उत्तर मागितले आहे. त्यामुळे दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी या बंदीचा कायदेशीर तपशील देण्याची मागणी नेस्ले इंडियाने केली आहे.