आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nestle Pays Ambuja Cements Rs 20 Crore To Destroy Maggi Packets

चंद्रपूरला जाळणार 320 कोटींची मॅगी; 'अंबुजा सिमेंट'ला कंत्राट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – राज्‍यात बंदीनंतर देशभरातून जमा केलेली मॅगीची एकूण 320 कोटी रुपयांची पाकि‍टं चंद्रपूर येथील अंबुजा सिमेंट प्रकल्‍पाजवळ पेटवून दिली जाणार आहेत. यासाठी 'नेस्ले इंडिया'ने अंबुला सिमेंटला तब्‍बल 20 कोटी रुपये देणार आहे.
मॅगीमध्ये चवीसाठी मोनोसोडियम ग्लुटामेटचा मर्यादेपेक्षा जास्त वापर आढळले. त्‍यामुळे केंद्रीय अन्न व सुरक्षा नियामक मंडळाने मॅगीसह नेस्ले इंडियाच्या नऊ प्रकारच्या नूडल्सवर बंदी घातली. तसेच बाजारातील नूडल्स परत मागवल्या. परत बोलवलेल्‍या या नूडल्स पेटवून देण्‍यासाठी अंबुजा सिमेंटची मदत घेतली जाणार आहे.
खर्च अजून वाढणार
देशभरातून परत आलेली मॅगीची पाकिटे चंद्रपूर येथील अंबुजाच्या सिमेंट प्रकल्पात जाळण्यात येणार आहेत. त्‍यासाठी अंबुजा सिंमेटला 20 कोटी रुपयांचे कंत्राट देण्‍यात आले आहे. मात्र, नूडल्स नष्ट करण्यासाठी बाजारातून नूडल्सचा साठा जमा करणे, कारखान्यापर्यंत पोहोचविणे याशिवाय इतर खर्चही होणार आहे. परिणामी, 'नेस्ले इंडिया' इंडियाला अजून जास्‍त खर्च येणार आहे.