आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शितावरून भाताची परीक्षा नकाे; नेस्ले कंपनीचा कोर्टात युक्तिवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शितावरून भाताची परीक्षा घेण्याच्या म्हणीप्रमाणेच फक्त काही निकृष्ट मॅगीच्या पाकिटावरून संपूर्ण उत्पादनच निकृष्ट ठरवणे तसेच त्यावर सरसकट बंदी घालणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद नेस्ले कंपनीकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.
शुक्रवारी नेस्लेकडून वकील इक्बाल छागला यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, मॅगीची काही पाकिटे किंवा एखादी बॅच निकृष्ट निघाली असेल तर तेवढ्या बॅचवरच बंदी घालायला हवी. सरसकट संपूर्ण मॅगीवरच बंदी घालणे अयोग्य आहे. याबाबत भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणास (एफएसएसएआय) एकही तक्रार प्राप्त झालेली नसतानाही मॅगीवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान तर सहन करावेच लागला, शिवाय प्रतिष्ठाही मलीन झाल्याचे छागला यांनी म्हटले आहे.

२५हजार टन मॅगी नष्ट : सरकारनेबंदी घातल्यामुळे बाजारातून परत मागवलेल्या ३० हजार टनांपैकी २५ हजार टन मॅगी नष्ट करण्यात आल्याचे छागला यांनी युक्तिवादात म्हटले आहे. दरम्यान, शंका उपस्थित झाल्याने देश-विदेशातील सुमारे २७०० प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात परवानगीपेक्षा ०.५ टक्के कमी शिसे असल्याचे दिसून आले होते. परंतु, मॅगी उत्पादनांच्या काही बॅचमध्ये शिशाचे प्रमाण अधिक असल्याचे आम्ही मान्य करतो पण त्यासाठी सरसकट बंदी घालू नये.
मात्र, एफएसएसएआयने मॅगीचे ज्या ठिकाणी परिक्षण केले त्या प्रयोगशाळा नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजकडून (एनएबीएल) मान्यताप्राप्त नसल्यामुळे त्यांचा दावा खोटा आहे, असे नेस्लेकडून सांगण्यात आले आहे.
एफएसएसएआय, राज्य सरकारविरोधात याचिका
मॅगीच्या नऊ प्रकारच्या उत्पादनांवर बंदी घातल्याप्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाविरोधात तसेच मॅगीच्या विक्रीवर बंदी घातल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारविरोधात नेस्ले कंपनीने जून रोजी याचिका दाखल केली आहे. याच प्रकरणाची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती.
बातम्या आणखी आहेत...