आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: नेव्ही अधिका-याच्या अल्पवयीन मुलीवर नेव्ही अधिका-याचाच बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत नेव्ही अधिका-याच्या अल्पवयीन मुलीवर नेव्हीतीलच अधिका-याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पवन सिंह असे बलात्कार करणा-या नेव्ही अधिका-याचे नाव आहे. पोलिसांनी पवन सिंहला अटक केली आहे. पवन सिंह यांना मदत केल्याप्रकरणी जितेंद्र वालचंद्र यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तर आणखी दोन साथीदार फरार आहेत. उमेश चौहान आणि राकेश सिंह अशी त्यांची नावे आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पवन सिंह आणि जितेंद्र वालचंद्र यांना कोर्टात हजर केले असता त्यांना 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की, पवन सिंह काही वर्षापूर्वी नेव्हीमध्ये ऑफिसर म्हणून ज्वाईन झाला आहे. तेथेच राहणा-या एका नेव्ही ऑफिसरच्या अल्पवयीन मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. अटकेत असलेला जितेंद्र वालचंद्र हा नेव्हीतील छोटी-मोठी कामे घेतो. त्यामुळे त्याचे पवनसिंह याच्याशी संपर्क आला. यातूनच त्यांची दोस्ती झाली. उमेश चौहान व राकेश सिंह हे या दोघांचे मित्र आहेत. पवन सिंह आपल्या गर्लफ्रेंडला फिरायला घेऊन जायचा. त्याच्यासमवेत त्याचे मित्रही फिरायला जायचे. त्यामुळे संबंधित अधिका-याची मुलगी व या चार तरूणांत मैत्रीचे संबंध झाले.
मात्र, पवन सिंह याच्याबरोबरचे संबंध बिघडताच संबंधित तरूणीने व तिच्या पालकांनी पवन सिंह व त्याच्या मित्रांविरोधात पोलिसांत लैंगिक शौषण केल्याची तक्रार दाखल केली. पवन सिंह याच्या उर्वरित तीन मित्रांनी तरूणीचे शौषण केले नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, मित्राला मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे प्रकरण वैयक्तिक वादातून पुढे आल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अधिक बोलण्यास नकार दिला आहे. पुढील तपास सुरु असून, पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...