आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Anti Magic Bill Introduce In Session Prithiviraj Chavan

नवे जादूटोणाविरोधी विधेयक अधिवेशनात मांडणार - पृथ्‍वीराज चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. वारकरी व हिंदुत्ववादी संघटनांशी चर्चा केल्यानंतर बदल करण्यात आलेले नवे जादूटोणाविरोधी विधेयक अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. तथापि, विरोधी पक्षांनी मात्र विधेयकाला तीव्र विरोध करणार असल्याचे जाहीर केले आहे.


जादूटोणाविरोधी विधेयकाच्या मसुद्याबाबत सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वारकरी प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. वारक-यांनी उपस्थित केलेल्या बहुतांश मुद्द्यांचे निराकरण झाले आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. अधिवेशनात इतर 12 विधेयकेही सभागृहासमोर मांडण्यात येणार आहेत.


चहापानावर बहिष्कार
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी सरकारच्या वतीने चहापानाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र विरोधी पक्षांनी ‘परंपरे’नुसार त्यावर बहिष्कार टाकला होता.