आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुख्यमंत्री तुमच्या घरात’; भाजपचा प्रचारात नवा फंडा, नवीन अॅप लाँच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- तुम्ही घरात आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर बसला आहात आणि मुख्यमंत्री चक्क तुमच्या घरात येऊन भाषण देत अाहेत.... हे स्वप्नवत वाटत असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून भाजपने निवडणूक प्रचारात अाता अनाेखी शक्कल लढवून हे शक्य करून दाखवले अाहे. जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इनव्हाइट सीएम’ नामक नवीन अॅपच्या माध्यमातून भाजपच्या आयटी सेलने हा करिश्मा करून दाखवला अाहे.  

भाजपच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख देवांग दवे यांनी सांगितले, ‘मुख्यमंत्र्यांची भाषणे सर्वच मतदार भाषण एेकू शकतील, असे नाही. त्यांना मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल याचा विचार आम्ही करीत होतो. ऑगमेंटेडे इंटिग्रिटेड रिअॅलिटी हे एक नवे तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा वापर करून मुख्यमंत्र्यांना घरोघरी पोहोचवता येईल असे आम्हाला जाणवले आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. यातूनच ‘इनव्हाइट सीएम’ नावाचे अॅप तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केलेल्या मणिशंकर यांनी हे अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे मुख्यमंत्री मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून भाषण करताना दिसणार आहेत. एवढेच नव्हे तर हे भाषण एेकताना तुम्हाला मुख्यमंत्र्यांसाेबत ‘सेल्फी’ही काढता येईल.  

अॅपबाबत दवे यांनी सांगितले, ‘जगात प्रथमच हे तंत्रज्ञान वापरून अॅप तयार करण्यात आलेले आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराच्या वेळी होलोग्राम तंत्रज्ञान वापरले होते. अाता  हे तंत्रज्ञान त्याच्या पुढची पायरी आहे. प्ले स्टोअरवर जाऊन ‘इनव्हाइट सीएम अॅप’ डाऊनलोड केल्यानंतर रांगोळीचे चित्र (बारकाेड) असलेले मार्करही डाऊनलोड करून त्याचे प्रिंटआऊट काढायचे आहे. हे प्रिंटआऊट सपाट जागेवर ठेवल्यानंतर अॅप सुरू करावे आणि या रांगोळीचे चित्र असलेल्या मार्करसमाेर मोबाइल कॅमेरा धरल्यानंतर पाच फूट दहा इंचाचे मुख्यमंत्री तुमच्यासमोर हजर होतील आणि भाषण देऊ लागतील. मात्र यासाठी मार्करपासून तीन ते दहा फुटापर्यंत मोबाइल न्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांची सर्व भाषणे यावर ताबडतोब अपलोड केली जाणार असल्याने नवीन भाषणेही जनता ऐकू आणि पाहू शकणार आहे’ असेही दवे यांनी सांगितले.
 
‘पोकेमॉन गो’मध्ये तंत्रज्ञान   
प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘पोकेमॉन गो’सह इंक हंटर आदी मोबाइल गेममध्ये  ऑगमेंटेड इंटिग्रिटेड रिअॅलिटी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. मात्र एखाद्या व्यक्तीसाठी प्रथमच हे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून सुपरइंपोज आणि बारकोडचा वापर करून मुख्यमंत्र्यांची संपूर्ण छबी मोबाइल कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर भाषण करताना दिसते.
बातम्या आणखी आहेत...