मुंबई - औरंगाबाद, वर्धा येथे ड्राय पोर्ट उभारले जाणार आहे. ड्राय पोर्टमुळे मराठवाडा, विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठवाडा तसेच विदर्भात उत्पादन करून निर्यात करणार्या व्यावसायिकांना लाभ तर मिळेलच, पण आयातदारांनाही याचा मोठा फायदा मिळणार आहे, असेही गडकरी म्हणाले. उरण न्हावाशेवा येथील जेएनपीटीअंतर्गत सेझ उभारणी कार्यक्रमावेळी गडकरींनी पंतप्रधान
नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ड्राय पोर्टची घोषणा केली.
समुद्र नसलेल्यांना ड्राय पोर्टचा फायदा : औरंगाबाद तसेच वर्ध्यात उभारल्या जाणार्या ड्राय पोर्टमुळे रोजगारांच्या हजारो संधी उपलब्ध होणार असून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल. समुद्राकाठच्या परिसरातील पोर्टमुळे आतापर्यंत तेथील भूमिपुत्रांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळत आल्या आहेत. मात्र, ड्राय पोर्टमुळे समुद्र नसलेल्यांना आता मोठा फायदा होईल. विशेषत: मराठवाडा, विदर्भासारख्या समुद्रापासून शेकडो मैल दूर असलेल्या विभागांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.
अविकसित भाग आंतरराष्ट्रीय नकाशावर
उपलब्ध संसाधनांचा देशाच्या आर्थिक विकासासाठी कल्पकतेने वापर करण्याचे केंद्र सरकारच्या धोरणांचे हे
http://genius.bhaskar.com/admin/submission.php# एक चांगले उदाहरण आहे. गडकरींना मराठवाडा व विदर्भाच्या अविकसित भागांची कल्पना असल्यानेच त्यांनी ड्राय पोर्टची संकल्पना या भागांसाठी पुढे आणली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.