आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Education Board For The Nurshing : Minister Council Decision

नर्सिंगसाठी नवे शिक्षण मंडळ : मंत्रिमंडळाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - परिचर्या व निमवैद्यकीय क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमाबाबत धोरणात्मक सल्ला देण्यासाठी ‘महाराष्‍ट्र राज्य परिचर्या अधिनियम व निमवैद्यकीय शिक्षण मंडळ अधिनियम 2013’ तयार करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. नर्सिंग अभ्यासक्रमावर या मंडळामार्फत नियंत्रण केले जाईल.


नर्सिंग अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके निश्चित करणे, प्रवेशासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी तयार करणे, उत्तीर्ण उमेदवारांना प्रमाणपत्र देणे अशा जबाबदा-या नव्या मंडळावर सोपवण्यात आल्या आहेत. परिचर्या अधिनियम 1966 मध्ये सुधारणा करून राज्यात अस्तित्वात असलेल्या इतर परिषदांकडे जेवढे अधिकार देण्यात आले आहेत तितकेच अधिकार नव्या परिचर्या परिषदेकडे ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देणा-या संस्थांवर आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नियंत्रण असते, परंतु नर्सिंग अभ्यासक्रमाबाबत अशा प्रकारची कार्यवाही परिचर्या परिषदेमार्फत करण्यात येते.


हिंगोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय
मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील गोळेगाव (ता. औंढा) येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयासाठी आवश्यक 65 पदे निर्माण करण्यात येणार असून, त्यासाठी 38 कोटी 65 लाख 85 हजार रुपये खर्च येणार आहे. या महाविद्यालयातील प्रवेश संख्या 60 इतकी राहील.