आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न चिघळत ठेवणे हा शेट्टींचा आवडता उद्योग; सादाभाऊ घटस्थापनेला काढणार नवी संघटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मी म्हणेन तेच खरे, असा राजू शेट्टींचा पहिल्यापासूनच पवित्रा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारबरोबर चर्चेला न येता शेट्टींनी आपली आठमुठी भूमिका दाखवून दिली. चर्चेला आलो तर आपल्या अस्तित्वाला धोका िनर्माण होईल, अशी भीती त्यांच्या मनात असावी. स्वामिनाथन आयोग तातडीने लागू करा, असे आता उठता-बसता बोलणाऱ्या शेट्टींनी त्या वेळी काँग्रेसच्या केंद्र सरकारविरोधात आंदोलन का केले नाही? प्रश्न चिघळत ठेवणे हा त्यांचा आवडता उद्योग आहे. आणि हे कमी म्हणून की काय, पदे मिळवण्यासाठी प्रसंगी भाजप, शिवसेना ते काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. संघटनेतून माझी हकालपट्टी करून मला मंत्रिपदावरून दूर करण्यातच त्यांना रस होता, अशी टीका स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी केलेल्या मंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी केली. 
  
खोत यांनी अपेक्षेप्रमाणे नवीन शेतकरी संघटना स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करत संघटनेचे नाव, नियमावली, झेंडा, बिल्ले, लोगो इत्यादींची घोषणा २१ सप्टेंबरला घटस्थापनेच्या दिवशी करण्यात येईल आणि दसऱ्याला इचलकरंजीला संघटनेचा पहिला शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे.    

सदाभाऊंनी आपल्या नवीन संघटनेचे प्राथमिक स्वरूप उलगडून दाखवले. नवीन संघटनेसाठी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील प्रतिनिधींचा समावेश आहे. ही समिती संघटनेची नियमावली तयार करणार आहे.   
 
राज्यमंत्री म्हणून आपण शेतकऱ्यांना न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे.  शेतकऱ्यांच्या सुखदु:खात सामील झालेल्या माझ्यासारख्या संघटकावर शेट्टी यांनी केलेले बेलगाम आरोप निश्चितच दुखावणारे होते, असेही ते म्हणाले. 

शेट्टींचे संघटक सदाभाऊंबरोबर    
सुरेशदादा पाटील (इचलकरंजी), गजानन अहमदाबादकर (विदर्भ), पांडुरंग िशंदे मांजरमकर (नांदेड), अॅड. सतीश बोऊलकर (औरंगाबाद) हे राजू शेट्टींचे अनुभवी संघटक आता सदाभाऊंबरोबर आले आहेत. या सर्वांचा नवीन संघटना उभारण्यासाठी मसुदा समितीत समावेश करण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असताना अनेक वर्षे माझ्यासोबत  असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम केले असून मी माणसे जोडणारा आहे, ताेडणारा नाही. यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून अनेक लोक आमच्या नवीन संघटनेत येत असतील तर त्यांना मी नाही म्हणणार नाही, असेही खोत यांनी स्पष्ट केले.   
बातम्या आणखी आहेत...