आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे विस्तारणार: पनवेल, अंबरनाथ- बदलापूरात महापालिका होणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील एमएमआरडीए क्षेत्रातील अंबरनाथ आणि कुळगाव, बदलापूर तसेच नवी मुंबईनजीकच्या नवीन पनवेल-उलवे या परिसरासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी सांगितले. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात सध्या सात महापालिका असून आता सरकारच्या या प्रस्तावामुळे आणखी दोन नव्या महापालिकांची भर पडणार आहे. अंबरनाथ आणि कुळगाव- बदलापूर या दोन स्वतंत्र नगर परिषदा असून त्यांचे नियोजन एमएमआरडीएकडे आहे. वाढते नागरीकरण व लोकवस्तीचा विचार करून दोन्ही नगर परिषदांचे एकत्रीकरण करून स्वतंत्र महापालिका निर्माण करण्याचा प्रस्ताव मुंबई नियोजन समितीकडे सादर केला आहे.
नवी मुंबईतील पनवेल, उलवे, कळंबोली आणि खारघर यांचा पनवेल नगरपालिकेत समावेश करून स्वतंत्र पनवेल महापालिका करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...