आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंढे म्हणाले- शासन बदली करत नाही तोपर्यंत मी आयुक्त, नगरसेवक आज CM च्या भेटीला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अविश्वास ठराव मंजूर केला असला तरी
आयुक्त तुकाराम मुंढे बुधवारी सकाळी कार्यालयात हजर झाले आहेत. 'शासन बदली करत नाही, तोपर्यंत मी आयुक्त आहे,' असे त्यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आज नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
- बेकायदेशीर बांधकामे, भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरणारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध सत्ताधाऱ्यांनी मंगळवारी आणलेला अविश्वास ठराव बहुमताने पारित झाला.
- मुंढे यांना पाठिंबा म्हणून जनतेने आंदोलनही उभारले होते. शासनाचा आदेश आल्याशिवाय जाणार नसल्याचे आयुक्त मुंढे यांनी निक्षून सांगितल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.
- सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस व शिवसेनेचे नगरसेवक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंढे यांना शासनाने परत बोलावण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.
- 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत, आयुक्त मुंढे यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली. नगरसेवकांचा विरोध का आणि कशासाठी आहे, हे माहित नसल्याचे ते म्हणाले. आयुक्त नगरसेवकांना वेळ देत नाही, लोकप्रतिनिधींचा सन्मान राखत नाही, याआरोपांवर मुंढे म्हणाले, माझ्या बद्दल गैरसमज पसरवले जात आहेत.
- मी मीटिंग किंवा कार्यक्रमात असेल तेव्हाच नगरसेवकांना वेळ देऊ शकलेलो नाही. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. नगरसेवकांसाठी दर बुधवारी सायंकाळी एक तासांचा वेळ राखून ठेवला होता. यावेळेत काही मोजकेच नगरसेवक आपले काम घेऊन आले होते, असेही त्यांनी सांगितले.
- बदली होणार की नाही हे मला माहित नाही, असे सांगत प्रामाणिकपणे काम करत राहिल असे त्यांनी सांगितले.
- बदली हा नोकरीचा भाग आहे, किती बदल्या होतात त्यापेक्षा त्या का होतात याचा शोध घेऊन आपल्यात काही त्रुटी राहात असेल तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न राहिले असेही त्यांनी सांगितले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...