आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Mumbai Pam Towers Unauthorised Contruction Will Be Demolition Today

कॅम्पा कोलानंतर आता पाम टॉवरचे बांधकाम पाडण्यास सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वरळीतील कॅम्पा कोला कपाऊंटनंतर आज नवी मुंबईतल्या वादग्रस्त पाम टॉवरवरही हातोडा पडला. कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार पाम टॉवरचे पाच मजले पाडण्याची कारवाई आजपासून सुरु करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कॅम्पा-कोला इमारतीवर कालपासून कारवाई सुरु करण्यात आली होती. मात्र, तेथील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था राज्य सरकारने व पालिकेने केली नसल्याने कोर्टाने कारवाईला सहा महिन्यांची स्थगिती दिली. तसेच सरकारला याबाबत लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर आता नवी मुंबईतील पाम टॉवरवर स्थानिक पालिकेने कारवाई सुरु केली आहे. टप्प्याटप्प्याने पुढील चार दिवस ही कारवाई करण्यात येणार आहे. पाम टॉवरवरही कारवाई करण्यात यावी, असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते.
पाम टॉवर हा आयडीबीआय बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे. सात गुंठ्याचा भूखंड सिडकोने आयडीबीआय कर्मचाऱ्यांना दिला होता. त्रिमूर्ती बिल्डरला सोसायटीने इमारत बांधण्याचे काम दिले होते. करारानुसार सोसायटीच्या 14 मजल्याच्या बांधकामाच्या मोबदल्यात बिल्डरला सोसायटीच्या जागेत 30 बहुपयोगी गाळे बांधण्याची परवानगी देण्यात आली. मात्र बिल्डरने हे गाळे बाजारभावानुसार मार्केटमध्ये विकले आहेत.