आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर जिल्हा आदिवासींच्या विकासाची देशातील प्रयोगशाळा ठरेल- मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: नव्या जिल्ह्याचे अधिकृत उद्घाटन कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना मुख्यमंत्री व त्यांचे इतर सहकारी)
मुंबई- पालघर या आदिवासीबहुल जिल्हयाचा सर्वांगिण विकास करताना इथल्या आदिवासी बांधवांची सांस्कृतिक ओळख पुसली जाणार नाही, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल आणि हा जिल्हा आदिवासी विकासाची देशातील प्रयोगशाळा ठरेल, असा ठाम आत्मविश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर येथे व्यक्त केला.
देशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन 1 ऑगस्टपासून पालघर हा राज्यातील 36 वा जिल्हा अस्तित्वात आला. या नव्या जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघरमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, विधानसभेचे उपसभापती वसंत डावखरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, विविध लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, या जिल्ह्यातील सर्व तालुके हे सहापदरी पक्क्या रस्त्याने जोडले जातील. त्यामुळे औद्योगिकरणास चालना मिळेल. नवे उद्योग येथे येतील आणि जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळेल. नवीन प्रशासकीय कार्यालयाची निर्मिती करताना अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशी ती होतील याकडे विशेष लक्ष राहील. महसूल प्रशासनाचा पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार येथून चालेल अशी व्यवस्था करु. हा जिल्हा भारतातील विकसित झालेला सर्वोत्तम जिल्हा करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल. पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने येथे सागरी सुरक्षा ॲकॅडमी स्थापन करण्यात येणार आहे. मासळी निर्यात करणे, नारळ संशोधन केंद्र असे अनेक नवे प्रकल्प भविष्यात येथे सुरू करण्यात येणार आहेत.
पुढे आणखी वाचा व नव्या पालघर जिल्ह्याविषयी...