मुंबई - शौर्यपदक प्राप्त शहिदांच्या कुटुंबीयांना इतर राज्यांप्रमाणे विशेष सवलती देण्यासाठी राज्य शासन लवकरच धोरण तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले जवान व पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
शहिदांच्या कुटुंबीयांना इतर राज्यांमध्ये विशेष सवलती दिल्या जातात. त्या महाराष्ट्रातही मिळाव्यात, अशी मागणी शहिदांच्या कुटुंबीयांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नियमाप्रमाणे ज्या सवलती लागू आहेत, त्याव्यतिरिक्त इतर राज्यांत जे धोरण आहे त्याचा अभ्यास करून महाराष्ट्राचे धोरण ठरवण्यात येईल. शहिदांच्या वारसांना पेट्रोल पंप, सीएनजी, गॅस एजन्सी देण्यात आलेल्या आहेत. मात्र, यासंदर्भात येणा-या समस्या सोडवण्यासाठी
आपण केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करू. तसेच पेट्रोलियम मंत्र्यांशी भेटण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.