आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New President Of Bjp Mumbai Unit Today May Decleared

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार की प्रकाश मेहता?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा व विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय उलथापलथी घडत आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबई शहर भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड आज होण्याची शक्यता आहे. वेंकय्या नायडूनंतर राज्याचे प्रभारी बनलेले राजीव प्रताप रुडी आज मुंबईत येत असून ते याबाबतची घोषणा करतील, असे सांगतिले जात आहे. दरम्यान, महायुतीत मनसेला घेण्यासाठी आतुर असलेले आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या गळ्यात माळ पडते की माजी मंत्री आमदार प्रकाश मेहता यांचा नंबर लागतो हे आज कळेल.


महाराष्ट्र भाजपचे प्रभारी म्हणून घोषणा झाल्यानंतर रुडी आज प्रथमच मुंबईत येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आपली फेरनिवड व्हावी यासाठी राज पुरोहित यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र त्यांची डाळ यावेळी शिजणार नसल्याचे दिसते. त्यामुळे शेलार आणि मेहता यांच्यात खरी चुरस लागल्याचे बोलले जाते.

महाराष्ट्र प्रभारी रूडी आज मुंबईत आल्यानंतर प्रथम ते पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. याचबरोबर मुंबईच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करून मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतील. पदाधिका-यांत नव्या अध्यक्षाच्या नावावर एकमत झाल्यास आज लगेच मुंबईतच घोषणा केली जाईल, अन्यथा एकापेक्षा अधिक नावे पुढे आल्यास नवी दिल्लीत जाऊन तेथून नाव जाहीर करण्यात येईल असे समजते. दरम्यान, तडफदार प्रदेशाध्यक्ष फडणविस यांची शेलार यांना पसंती दिल्याचे कळते. मात्र, अमराठी हा निकष लावला तर मेहताही बाजी मारू शकतात, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.