आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दगडापासून वाळू तयार करणाऱ्यांना सवलती, एकनाथ खडसेंची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्या दिवसेंदिवस वाळू मागणी वाढत असून त्यानुसार ती उपलब्ध होत नाही. त्यामुळे दगडापासून वाळू निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सवलती देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. अशा कंपन्यांना वीज बिलात सवलत देण्याबरोबरच दगडाच्या रॉयल्टीवर १०० टक्के सवलत देण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

पालघर जिल्ह्यातील वैतरणा, सूर्या नदी व खाडी पात्रात अवैध वाळू उत्खनन होत असल्याबाबतचा तारांकित प्रश्न पास्कर धनारे यांनी उपस्थित केला होता. उत्तर देताना खडसे यांनी सांगितले, की ‘अवैध वाळू उत्खननावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार नवीन वाळू धोरण आणणार आहे. या नवीन धोरणात अवैध वाळू नेणारी वाहने जप्त करून त्यांचा त्वरित लिलाव केला जाणार आहे. तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची सुरुवात केली अाहे. बुधवारी जळगाव येथे एमपीडीए अंतर्गत पहिली कारवाई करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांकडून आता पाच पटीपर्यंत रक्कम दंड म्हणून वसूल केली जाईल.’
बातम्या आणखी आहेत...