आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपर राजधानी एक्सप्रेसने दिल्ली- मुंबईतील अंतर झाले कमी; जाणून घ्या या बाबी आहेत खास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ नवी दिल्ली- दिल्ली-मुंबईदरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुपर राजधानी एक्स्प्रेसच्या रुपात  भारतीय रेल्वेने दिवाळीची भेट दिली आहे. नवी सुपर राजधानी एक्स्प्रेस कालपासून (16 ऑक्टोबर)  सुरु झाली. इतर राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत सुपर राजधानीचा वेग जास्त आहे. त्यामुळे प्रवास कालावधी तब्बल दोन तासांनी कमी होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

फ्लेक्सी फेअर सिस्टिम नाही...
या एक्स्प्रेससाठी 'फ्लेक्सी फेअर सिस्टिम' नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर जाहीर केले आहे. याचा अर्थ असा की, तिकीट दर प्रत्येक 10 टक्के सीट्‍स बुक झाल्यानंतर 10 टक्क्यांने वाढणार नाही. परंतु इतर राजधानी एक्स्प्रेससाठी फ्लेक्सी फेअर सिस्टिम लागू आहे.

600-800 रुपयांनी तिकीट स्वस्त
सुपर राजधानीने प्रवास केल्यास इतर राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत 600-800 रुपये कमी मोजावे लागतील. सुपर राजधानी एक्स्प्रेस दिल्लीच्या निझामुद्दीन स्टेशनवर आठवड्वातून तीन दिवस (बुधवार, शुक्रवार आणि शनिवार) तर मुंबईच्या बांद्रा स्टेशनवरून प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल. 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या... दिल्ली-मुंबईदरम्यान धावणार्‍या सुपर राजधानीशी संबंधित 10 खास बाबी... कदाचित तुम्हाला माहिती नसतील...
 
बातम्या आणखी आहेत...