आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मेट्रो आजपासून महाग, 10, 15 व 20 रूपये अशी 31 जुलैपर्यंत दरवाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मुंबई मेट्रोचे संग्रहित छायाचित्र)
मुंबई- आजपासून मुंबई मेट्रोची दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा मेट्रो प्रवास निम्म्याने महागला आहे. पूर्वीच्या 9, 13 व 17 रूपयांवरून आता 10, 15 व 20 रूपये असे नवे दर असतील. ही दरवाढ 31 जुलैपर्यंत राहील. वर्सोवा ते घाटकोपरपर्यंतच्या प्रवासासाठी आता 20 रुपये मोजावे लागणार आहेत.

हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही दरवाढ करण्यात आली आहे. हायकोर्टाने सुरुवातीच्या 3 किलोमीटरसाठी 10 रुपये, 3 ते 8 किलोमीटरसाठी 15 रुपये आणि 8 ते 20 किलोमीटर म्हणजेच शेवटच्या टप्प्यासाठी 20 रुपये दरवाढ करण्यास मुंबई मेट्रो वन कंपनीला परवानगी दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती मोहीत शहा आणि न्यायमूर्ती सोनक यांच्या खंडपीठाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दरवाढीविरोधात दाखल केलेल्या अपिलावर हा निर्णय दिला. तसेच या याचिकेची पुढील सुनावणी 24 जुलै रोजी ठेवली आहे. त्यापूर्वी हायकोर्टाने राज्य सरकारला सरकारने एक संयुक्त दरवाढ समिती स्थापन करून नविन दर निश्चित करावेत असे निर्देश दिले आहेत.