मुंबई- 'मुंबई चाळ' हा टीव्ही शो लवकरच सुरु होणार आहे. यात मुंबईतील चाळीत राहाणार्या लोकांचे आयुष्य दाखवण्यात येणार आहे. या अनुषंगाने आपल्या आपल्याला देशातील सर्वात मोठा स्लम एरिया धारावीतील चाळमध्ये राहाणार्या लोकांविषयी माहिती देत आहोत.
धारावीत बनलेल्या चाळीतील एका खोलीत 10-12 लोक एकत्र राहातात. सुप्रसिद्ध विदेशी फोटोग्राफर जोनस बेंडिकसेन यांनी कॅमेर्यात कैद केलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून स्लम भागात राहाणारे लोक कसे आयुष्य जगातात हे सांगणार आहोत.
काय खास आहे या फोटो सीरीजमध्ये...- फोटोग्राफर जोनस बेंडिकसेन यांनी तब्बल एक महिना धारावीत काढला. स्लम भागात राहून त्यांनी नॅशनल जियोग्राफीसाठी फोटो शूट केले.
- या फोटो सीरिजला जोनस यांनी 'धारावी' असे टायटल दिले आहे. फोटोग्राफसोबत चॅनलसाठी व्हिडिओ डाक्युमेंट्री तयार केली होती.
- जोनस यांनी धारावीत राहाणार्या लोकांचे दैनंदिन आयुष्य कॅमेर्यात कैद केली आहे.
- 'धारावी' फोटो सीरिजसाठी जोनस यांना दोन इंटरनॅशनल अवार्ड देखील मिळाले.
एका झोपडीची किंमत कोटींच्या घरात....
- एक मिलियन लोकसंख्या असलेली धारावी पश्चिम माहिम आणि पूर्व सायन दरम्यान 557 एकर जागेत विस्तारीत आहे.
- सन 1880 मध्ये ब्रिटिशांनी धारावीत मुंबईच्या बाहेरून आलेल्या लोकांना जागा दिली होती.
- धारावीतील एका झोपडीची किंमत आज कोटींच्या घरात आहे. रिअल इस्टेट रिपोर्टनुसार, येथे 1 Sqft जमिनीचा दर जवळपास 25,000 ते 30,000 रुपये आहे.
कोण आहेत जोनस बेंडिकसेन?
जोनस यांनी लंडनमध्ये 'मॅगनम फोटो स्टूडिओ' सुरु करुन करिअरला सुरुवात केली. नंतर ते काही वर्षे रशियात राहिले.
- दोन डझणपेक्षा जास्त इंटरनॅशनल अवार्ड विजेता जोनस यांचे अनेक फोटो बुक प्रकाशित झाली आहेत.
- सोव्हियत यूनियनवर प्रकाशित झालेले पुस्तक 'सॅटलाइट'ने जोनस यांना प्रचंड प्रसिद्ध मिळवून दिली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा... आशियायातील सर्वात मोठा स्लम एरिया धारावीत राहाणार्या लोकांची LIFE