मुंबई- मुंबईतील वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकारी सुनील पारसकर यांनी एका मॉडेलवर केलेल्या बलात्कार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. बलात्काराचा आरोप करणा-या मॉडेलचे माजी वकीला रिझवान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की, संबंधित मॉडेलने प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. प्रसिद्धी मिळाली की बिग बॉससारख्या रियालिटी शोमध्ये जाण्याची संधी मिळेल असा तिचा हेतू होता.
आपल्या दावा सादर करताना वकील रिझवान सिद्दीकी यांनी एक सीसीटीव्ही फुटेज सादर केले आहे. दरम्यान, याबाबत मॉडेलने रिझवान सिद्दीकी खोट बोलत आहेत असा दावा केला आहे. यासंबंधित पोलिसांच्या गुन्हे शाखेने रिझवान सिद्दीकी यांना चार तास चौकशी केली. यावेळी त्यांनी मॉडेलव्दारा व्हाट्सअप आणि एसएसएमवर केलेले मॅसेज पोलिसांकडे सोपवले.
पूनम पांडेसोबत तिची दुश्मनी- वकील रिझवान सिद्दीकीने दावा केला आहे की, बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल आणि मॉडेल पूनम पांडे यांच्यात जुने वाद आहेत. या मॉडेलला संशय होता की, ती जेथे काम मागण्यासाठ जाते तेथे पूनम पांडे आडवी येते. याचवरून तिने डीआयजी सुनील पारसकर यांना फसविण्याचे प्लॅनिंग सुरू केले. यासाठी तिने सर्वप्रथम वकील रिझवान सिद्दीकीला गाठले व सर्व हकीकत सांगितली. याच संभाषणाचे व्हिडिओ रिझवान यांनी आता प्रसारित केला आहे. या व्हिडिओत संबंधित मॉडेल वाद कसा उभा राहिल याची चर्चा करीत आहे.
तसेच डीआयजीला फसविण्याबाबत बोलताना दिसत आहे. याबाबत वकील रिझवान सिद्दीकीचे म्हणणे आहे की, सुरुवातीला संबंधित मॉडेलने डीआयजी सुनील पारसकर यांच्याकडून बलात्कार, लैंगिक शोषण याबाबत काहीही माहिती दिली नाही. मात्र, मला जसे या केसची आतील माहिती मिळताच मी केसमधून माघार घेतली.
या दोघांतील संभाषणाचा अंश आम्ही तुमच्यासाठी देत आहोत...
मॉडेल वकीलाला म्हणते, 'तुम सोचो कि हम किसी को फंसा सकते है. मूवीज मे कैसे होता है? वैसे वाला प्लॉट चाहिए.
वकील- तुम को हिलाना है न ?
मॉडेल- see तुम ढूंढो.
वकील- मै ढूंढता हू, मेरे हिसाब से.
मॉडेल- because i really want to harash him
वकील- वह तुम मुझ पर छोड दो.
मॉडेल- harrasment नही मुझे उसकी बैड पब्लिसिटी करनी है, thats all i want. मुझे उसको परेशान नही करना, its like 2-3 उसे न्यूज मे आने दो, thats all. उसकी इमेज खराब करनी है और कुछ नही.
वकील- इससे 2-3 चीजे होंगी...सबसे पहली बात ये बदनाम हो जाएगा. पूनम पांडे के थ्रू ये काम करता था, ये indirectly बाद मे जाके तुम उसे कर सकती हो.
पुढे वाचा, डीआयजी पारसकर यांनी अशी भूमिका का घेतली?...