आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या ब्रिटीशकालीन वर्दीत होणार बदल, हवामानासह अन्य बाबींचाही होणार विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपले पोलिस कर्मचारी आता स्मार्ट युनिफॉर्ममध्ये दिसतील. पोलिसांच्या गणवेशात लवकरच बदल करण्यात येणार आहे. ब्युरो ऑफ रिसर्च अँड डिवेलपमेंटच्या सहकार्याने वर्दीचे 9 नमूने तयार करण्यात आले आहेत. यात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपी आणि जॅकेटचा समावेश आहे. 
अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेकडे हे काम सोपवण्यात आले आहे.
 
देशभरातील पोलिस सध्या ब्रिटीशकालीन खाकी वर्दी परिधान करत आहेत. आता पोलिसांना सर्व हवामानात आरामदायी ठरणारा डिझायनर गणवेश दिला जाणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही संस्था सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशातील पोलिस आणि निमलष्करी दलासाठी नवा गणवेश बनवणार आहे. वर्दीशिवाय रेनकोट आणि हेडगिअरचे डिझाईनही बनवण्यात आले आहे. हे डिझाईन सर्व राज्यांच्या पोलिसांना शेअर करण्यात आले आहे, जेणेकरुन ते आपल्या पसंतीने गणवेश निवडू शकतात.
 
सध्याच्या वर्दीमध्ये अनेक अडचणी आहेत. वर्दीत समानता नाही. पोलिसांच्या गणवेशाचे कापड फारच जाड असल्याने उन्हाळ्यात त्रास होतो. शिवाय वर्दीत जास्तीत जास्त गोष्टी ठेवण्याची पर्यायी जागा नाही. असा प्रतिक्रिया सध्या असलेल्या गणवेशाबाबत मिळाल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...