आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Newasa Mascra 's Three Youth Killing Investigation To Cid : Chief Minister

नेवासा हत्याकांडातील तीन तरुणांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत :मुख्यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अहमदनगर जिल्हयातील नेवासा येथील वाल्मिकी समाजातील तीन तरुणांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी दिली. यासह अन्य मागण्यांसाठी जोशी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.पीडीत कुटुंबीयांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरी आणि खटला अहमदनगर बाहेर चालवला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे जोशी यांनी पत्रकारांना सांगितले.

नेवासे या गावात काही दिवसांपूर्वी तीन तरुणांची अमानूषपणे हत्या करण्यात आली होती. त्याबाबत विधान परिषद सदस्य मोहन जोशी यांनी वाल्मिकी समाजातील काही कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.
जोशी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, पीडीत कुटुंबीयांच्या घरातील एकाला नोकरी देण्याचेही आश्वासन दिले आहे. तसेच या खटल्यावर स्थानिकांचा कोणताच परिणाम होऊ नये म्हणून हा खटला जळगाव, नाशिक अथवा पुणे येथे वर्ग करण्यात येवून या खटल्यासाठी सरकारतर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, असेही आश्वासन दिले आहे.

यापूर्वी पीडित कुटुंबीयांना दीड लाख रुपयांची मदत सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री निधीतून आणखी मदत देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे जोशी यांनी सांगितले.