आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जन्मताच अशी म्हातारी दिसते ही चिमुकली, आईने दूध पाजण्यास दिला नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एखादी आई आपल्या नुकत्याच झालेल्या बाळाला दूध पाजण्यास नकार देईल... नाही ना... पण मुंबईत एक असेच प्रकरण समोर आले आहे. आईने आपल्या बाळाला दूध पाजण्यास नकार दिला आहे. कारण जन्मायला आलेली ही मुलगी अगदी म्हातारी दिसते. आईवडीलांनी तिला स्विकारण्यास नकार दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी जन्म झालेल्या या मुलीवर मुंबईच्या नुशरजी वाडिया मॅटरनिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
इंट्रा-युट्रीन ग्रोथ रिटार्डेशन एक दुर्मिळ आजार
ही चिमुकली इंट्रा-युट्रीन ग्रोथ रिटार्डेशन या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. तिची त्वचा जन्मताच म्हाताऱ्या बाईसारखी आहे. हा अनुवांशिक आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या चिमुकलीच्या त्वचेवर सुरकुत्या आहेत आणि ती दिसायला फारच बारीक आहे. 1000 पैकी केवळ 0.1 ते 0.2 टक्के बाळांनाच हा आजार होतो. या मुलीच्या हृदयात शिद्रही आहे. तिचे वजन केवळ 800 ग्राम आहे. सातव्या महिन्यात झालेली ही प्रीमॅच्युअर बेबी आहे.
आजोबा म्हणाले- मी तिला सांभाळणार
आईवडील ममता डोडे आणि अजय डोडे यांनी या मुलिला स्विकारण्यास नकार दिला आहे. आता या चिमुकलीचे आजोबा दिलीप डोडे यांनी पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली आहे. पालघर जिल्ह्यातील एका गावातून ते तिला उपचारासाठी मुंबईत घेऊन आले आहेत. पण तिला कुणी कडेवरही घेत नाही. हा आजार आपल्याला होऊ नये अशी लोकांना भीती वाटते. सध्या तिला बकरीचे दूध दिले जात आहे.
हॉस्पिटलने उचलला उपचाराचा खर्च
या चिमुकलीवर होणाऱ्या उपचारांचा खर्च उचलण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला आहे. यासाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज आहे. या व्यतिरिक्त हॉस्पिटलने दिलीप यांच्या राहण्याची सोय केली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या चिमुकलीचे फोटो... आईविना आहे ही आजारानेग्रस्त पोर...
बातम्या आणखी आहेत...